पप्पा लवकर घरी या, आपलं घर जळतंय; संदीप क्षीरसागर यांनी सांगितली आपबीती

| Updated on: Dec 15, 2023 | 5:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज अधिवेशनात भाष्य केले. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांचं राहतं घर पेटवल्याची घटना सभागृहात सांगत असताना त्यांनी आपबीती कहाणीच सभागृहात सांगितली.

नागपूर, १५ डिसेंबर २०२३ : सध्या राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून बीडमधील जाळपोळीच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज अधिवेशनात भाष्य केले. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांचं राहतं घर पेटवल्याची घटना सभागृहात सांगत असताना त्यांनी आपबीती कहाणीच सभागृहात सांगितली. पप्पा लवकर घरी या, आपलं घर जळतंय… असा माझ्या लहान मुलाचा फोन आला होता. बीडमधील जाळपोळीच्या घटनेसंदर्भात सभागृहात बोलताना संदीप क्षीरसागर यांनी आपबीती सांगितले. ते म्हणाले, ‘एक तास माझं घर जळत होतं. माझं कुटुंब आत होतं. माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता. आपलं घर जळतंय आपल्या घरात बॉम्ब टाकताय. आमदार म्हणून मी प्रश्न विचारतोय आपल्या मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली असती, आपण पोलिसांना वारंवार फोन करतोय आणि तिथे सायरन सुद्धा वाजत नाही’, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

Published on: Dec 15, 2023 05:08 PM
एकनाथ शिंदे यांनी वरळीतून लढावं, नाहीतर… आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज काय?
नितेश राणे यांनी केलेले ‘ते’ गंभीर आरोप सुधाकर बडगुजर यांनी फेटाळले; म्हणाले, माझा संबंध…