तेव्हा ‘पापापा’ अन् आता ‘काकाका’… अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात जुंपली
आता पापापा सारखं काकाका असं करावं लागणार असं अजित पवार यांनी वक्तव्य करत शरद पवार गटाला टोला लगावला होता. त्याला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशासतसं उत्तर दिलंय.
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : सका पाटील यांच्या एका प्रसंगावरून सध्या काका या शब्दाची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटातील एका नेत्याने दिलेल्या उदाहरणावरून ही चर्चा सुरू झाली. तर यावरून शरद पवार गटाने अजित पवार यांना घेरलंय. आता पापापा सारखं काकाका असं करावं लागणार असं अजित पवार यांनी वक्तव्य करत शरद पवार गटाला टोला लगावला होता. त्याला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशासतसं उत्तर दिलंय. कुणीतरी म्हणालं काका का? जनता म्हणाली काका चं का? असा खोचक सवाल करत ते म्हणाले, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का? असे म्हणत त्यांनी कवितेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बघा अमोल कोल्हे यांची कविता अन् पलटवार…
Published on: Feb 16, 2024 11:34 AM