बोटावर मतदानाची शाई पण बटण दाबायला गँग? काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर वाल्मिक कराडशी संपर्क साधा..’, जितेंद्र आव्हाडांचं गंभीर आरोप
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान झालं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
गेल्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान झालं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर बटण दाबण्याचं काम गँग करायची असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर सगळं एकदम पारदर्शक असल्याचे पोलिसांसमोर राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं. पण काही ठिकाणचे व्हिडीओ समोर आलेत. पण कोण काय करणार? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, ‘परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत तुमचे बटण दाबण्याचे काम ही गँग करायची ‘ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला तर सगळे एकदम पारदर्शक असल्याचे परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी पोलिसांसमोर सांगितले. पण काही ठिकाणचे व्हिडीओ आहेत. कोण काय करणार? हे कायद्याचे राज्य आहे. पुढे कुणाला काँट्रॅक्ट द्यायचे असेल तर वाल्मिक कराडशी संपर्क साधावा, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.