बंडावरून काका-पुतणे भिडले, अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: Dec 25, 2023 | 1:38 PM

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. आपलं बंड हे बंड नव्हतंच, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. असं स्पष्ट भाष्य शरद पवार यांनी करत प्रत्युत्तर दिलं आहे.

पुणे, २५ डिसेंबर २०२३ : ‘मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर वयाच्या 38 व्या वर्षीच वेगळा निर्णय घेतला होता. वसंतदादा पाटील चांगलं काम करत असताना त्यांनीही बाजूला सारण्यात आलं होतं’, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. आपलं बंड हे बंड नव्हतंच, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधार लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 25, 2023 01:34 PM
JN.1 Covid variant : JN1 कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नागरिकांना धस्का, काय आहेत लक्षणं?
एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपनं मुंबई लुटली? ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात