Sharad Pawar : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करणार? स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Nov 15, 2024 | 5:55 PM

शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आज विशेष मुलाखत दिली. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवार यांना पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा. मग तुम्ही काय करणार? असा थेट सवाल केला असता शरद पवार म्हणाले....

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला आज विशेष मुलाखत दिली. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी शरद पवार यांना पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा. मग तुम्ही काय करणार? असा थेट सवाल केला असता शरद पवारांनी स्पष्ट आपली प्रतिक्रिया दिली. मतदान झालं नाही आणि त्याआधी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणं योग्य नसल्याचं म्हणत शरद पवार म्हणाले, तिचा इंटरेस्ट नाही. तिचा इंटरेस्ट संसदीय राजकारणात आहे, असं मला दिसतंय. लोक मागण्या काही करतील. शेवटी आपली पसंती काय आहे हे देखील बघावं लागतं. आमच्या पक्षामध्ये विधानसभेचे सदस्य एकत्र बसून निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले तर निवडणुका होऊ दिल्या पाहिजेत. किती नंबरला येतो, तो नंबर कसा आहे, तो 2-3 पक्षांचं मिळून एकत्र सरकार बनवायचं आहे की सिंगल पार्टीचा आहे. आता आमचा प्रश्न आला की सिंगल पार्टी म्हणून पण आम्ही तेवढ्या जागाच लढत नाहीयत की उद्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघावी. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊ. संख्या चांगली असेल, एकत्र बसू, असे शरद पवार म्हणाले.

Published on: Nov 15, 2024 05:55 PM
Sharad Pawar : ‘लाडकी बहीण’चा महायुतीला फायदा होणार? शरद पवार म्हणाले, ‘नाव गोंडस दिलं पण…’
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण…काय म्हणाले शरद पवार