पवारांमध्ये वयाच्या मुद्द्यावरून पुन्हा जुंपली; शरद पवार यांचा अजितदादांना थेट सवाल, तुम्हाला संधी…

| Updated on: Jan 21, 2024 | 12:06 PM

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी वयाच्या मुद्द्यावरून वारंवार शरद पवार यांना कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या घेरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी नुकतीच नाव न घेता शरद पवार यांच्यावर भाष्य करताना वयावरून टीका केली

मुंबई, २१ जानेवारी २०२४ : महिला सशक्तीकरण आणि वयाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपली आहे. अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाने अजित पवार यांच्या जुन्या विधानांचा दाखला दिला आणि त्यांनाच सवाल केला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी वयाच्या मुद्द्यावरून वारंवार शरद पवार यांना कधी थेट तर कधी अप्रत्यक्षरित्या घेरल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी नुकतीच नाव न घेता शरद पवार यांच्यावर भाष्य करताना वयावरून टीका केली. तरूणांना संधी दिली पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी करत शरद पवार यांच्यावर खोचक अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावर प्रत्युत्तर देत शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्यासारखे तरूण नेते राजकारणात कुणी आणले? असा सवालच शरद पवार यांनी केला. तर भाजपमध्ये ७५ वर्षानंतर निवृत्त होतात. हे उदाहरण देत अजित पवार यांनी फुटीनंतर वयाचा मुद्दा उपस्थित केला होता.मात्र सत्तेत जाण्यापूर्वी अजित पवार यांनी काय वक्तव्य केले होते, त्याचा व्हिडीओच शऱद पवार गटाने शेअर केलाय.

Published on: Jan 21, 2024 12:06 PM
ईडीचं हत्यार, कोर्टात लढणार… रोहित पवार यांना ED चं समन्स, शरद पवार आक्रमक; काय म्हणाले बघा?
Pune Mega Block : पुणेकरांनो… आज पुणे-लोणावळा मार्गावरील ‘या’ लोकलच्या 12 फेऱ्या रद्द