Sharad Pawar : ‘सांगा काय चुकलं?,’ देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात शरद पवार दाखल होत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत. शरद पवार म्हणालेत...
‘शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शरद पवारांना सल्लाच दिला. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात शरद पवार दाखल होत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत. शरद पवार म्हणालेत, काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली. तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे?काही पद्धतीबाबत लोकांच्या मनात शंका आली. त्याची माहिती घेऊन त्याचं निरसन करणं हे चुकीचं आहे? लोकशाही कशासाठी आहे. लोकांचे अधिकार काय आहे. हे अधिकार जतन करण्यासाटी अडचण येत असेल तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथे घडलं, इथल्या लोकांच्या मनात शंका आहे. त्याचं निरसन करायचं आहे. असं कुठं होऊ नये जेणे करून निवडणूक आयोगाच्या मनात गैरविश्वास जनतेत होऊ नये एवढंच आहे. त्यात राजकारण नाही. म्हणून मी सांगतो तसा ठराव करा. आम्ही ही माहिती राज्यसरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे देऊ. शक्य झालं तर मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. तर त्यांना सांगेल गावात या. लोकांचं म्हणणं ऐका आणि शक्य असेल त्यांच्या मनातील शंका दूर करा. असं आम्ही सीएमला सांगणार. मुख्यमंत्री इकडे यायला आमची अडचण नसल्याचे शरद पवार मारकडवाडीतून म्हणालेत.