Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीनंतर शरद पवार यांचं पहिलं ट्विट, शुभेच्छा देत म्हणाले…

| Updated on: May 03, 2023 | 10:07 AM

VIDEO | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर शरद पवार यांचं ट्विट, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार निर्णय मागे घ्या, अशी विनंती केली. तर काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राचा हा दुसरा भाग आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा दिला. दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर शरद पवार यांचं पहिलं वहिलं ट्विट समोर आलं आहे. या ट्विटमध्ये शरद पवार यांनी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते ट्विटमध्ये असे म्हणाले की, ‘पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ आहे. पत्रकारिता मूल्ये आणि निष्पक्ष पत्रकारितेचा बाणा जपण्याकरता पत्रकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्धार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया.

Published on: May 03, 2023 10:03 AM
पवारांच्या राजीनाम्यावर राऊत, फडणवीस आणि पटोलेंची प्रतिक्रिया; काय नेत्यांची मन की बात?
शिवसेना नेते संजय राऊत बेळगावात कोणावर साधणार सिधा निशाना?