लक्षद्वीपच्या निवडणुकीत राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादी? एनडीएत लक्षद्वीपची जागा अजित पवारांच्या पक्षाला

| Updated on: Mar 24, 2024 | 11:20 AM

राष्ट्रवादीच्या फूटीचा संघर्ष महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरही यंदा बघायला मिळणार आहे. कारण भाजपने लक्षद्वीपची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोडण्याचा विचार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी ट्वीटद्वारे दिली.

लक्षद्विपमध्ये यंदा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगताना दिसणार असल्याची शक्यता आहे. लक्षद्विपची जागा एनडीएमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या फूटीचा संघर्ष महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरही यंदा बघायला मिळणार आहे. कारण भाजपने लक्षद्वीपची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोडण्याचा विचार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी ट्वीटद्वारे दिली. लक्षद्वीपमध्ये आताचे खासदार मोहम्मद फैजल शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे लक्षद्विपला अजित पवार जो उमेदवाराला संधी देतील त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. जिथे भाजपला १५० मतंही मिळाली नाही ती जागा अजित पवार यांना मिळाल्याने विरोधकांनी हल्लाबोल केलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मोहम्मद फैजल यांना २२ हजार ८५१ मतं मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार हमदुल्ला सईद २२ हजार २८ मतं मिळाली होती आणि ते विजयी झाली होते तर भाजपचे उमेदवार अब्दुल कादर यांना १२५ मतं मिळाली होती. मात्र यंदा नेमकं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 24, 2024 11:20 AM
राज ठाकरेंचा केवळ महायुतीत सहभागच नाही तर शिवसेनेचीही मिळणार कमान?
शिंदेंच्या पुत्राविरोधात आनंद दिघेंचे पुतणे कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?