शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक

| Updated on: Feb 22, 2024 | 11:31 AM

१९८० च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि सोडून गेलेले आमदार पुन्हा पराभूत होणार असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार यांना दिलाय. तर अजित पर्वात नवा इतिहास रचणार असल्याचे तटकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार यांनी थेट इशारा दिलाय. १९८० च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि सोडून गेलेले आमदार पुन्हा पराभूत होणार असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार यांना दिलाय. तर अजित पर्वात नवा इतिहास रचणार असल्याचे तटकरे यांनी म्हटलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच अधिक यश मिळणार हे सांगताना सर्वेक्षणातून महाराष्ट्राला आता ५० टक्के जागा मिळणार असल्याची आकडेवारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरूवात केली आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे चांगलेच बरसले. बघा शरद पवार गटाच्या आमदारांनी अजित पवार आणि त्यांच्या गटावर काय केला हल्लाबोल?

Published on: Feb 22, 2024 11:31 AM
सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, जरांगेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकारला फुटणार घाम?
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या देतो.. अजय बारसकर यांचे जरांगेंवर सनसनाटी आरोप