बारामतीतून युगेंद्र पवार? विधानसभेसाठी दादांच्या आमदारांविरोधात पवारांकडून ‘या’ 20 तरूण उमेदवारांना तिकीट?
आता झिरवळ पिता-पुत्र आमने-सामने येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण विधानसभेला शरद पवार २० तरूण उमेदवारांना तिकीट देणार असल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाहीतर पक्ष सोडून गेलेल्या आमदरांविरोधात युवा नेते शरद पवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून युगेंद्र पवार यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. तर दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांच्याविरोधात त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता झिरवळ पिता-पुत्र आमने-सामने येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण विधानसभेला शरद पवार २० तरूण उमेदवारांना तिकीट देणार असल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाहीतर पक्ष सोडून गेलेल्या आमदरांविरोधात युवा नेते शरद पवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. २० मतदारसंघात शरद पवार ज्या तरूण-युवकांना मैदानात उतरवणार आहेत, यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत. विधानसभेतील या २० मतदारसंघात अहेरी, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती यासारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे. बघा कोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे?