भाजप नेत्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, सहकार खात्यावरुन राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात सहकार खात निर्माण केलं आहे. यापूर्वी सहकार हा विषय कृषी खात्याकडे आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार देण्यात आला. अमित शाह सहकार खात्याचे मंत्री झाल्यानंतर राज्यातील काही भाजप नेत्यांनी धमकी दिली, असं नवाब मलिक म्हणाले.
मुंबई: केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात सहकार खात निर्माण केलं आहे. यापूर्वी सहकार हा विषय कृषी खात्याकडे आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार देण्यात आला. अमित शाह सहकार खात्याचे मंत्री झाल्यानंतर राज्यातील काही भाजप नेत्यांनी धमकी दिली. अमित शाह खात्याचे मंत्री झाल्यानंतर राज्यातील सहकार खात्यात काम करणाऱ्या नेत्याची काही खैर नाही, असं भाजप नेते म्हणाले. सहकार खातं हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. मल्टी स्टेट सोसायटी असते तेव्हा हा कारभार केंद्राकडं जातो. बँकाबाबतचं नियंत्रण आरबीआयकडं असतो. केंद्र सरकार या खात्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतंय ते अजून पुढं आलेलं नाही. जे भाजपचे नेते धमकी देत आहेत. त्यांना असा प्रकार करणं बरोबर नाही, हे समजलं पाहिजे. सहकारात स्वायतत्ता देण्यासाठी 97 व्या घटनादुरुस्ती शरद पवार कृषी मंत्री असताना करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्रात निवडणूक घेण्यासाठी आयोग निर्माण करण्यात आला. सहकाराला स्वायतत्ता देण्याचं काम यूपीए सरकारच्या काळात सुरु झालं.