‘मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष मनसे अन् त्यात अट्टल गुन्हेगार’, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
आम्ही जिवंत आहोत असा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. तर अमोल मिटकरी यांना धमकी देणाऱ्या लोकांना मी सांगतो की, वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा जिथ यायचं आहे, तिथे बोला आणि...
मनसे हा पक्ष मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष आहे. मनसे पक्षातील पदाधिकारी हे अट्टल गुन्हेगार आहेत. आणि अशा लोकांची संख्या त्यांच्याकडे आहे. या लोकांकडून सुसंस्कृतपणा संदर्भात अपेक्षा ठेवू शकत नाही, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राज ठाकरेंच्या पक्षावर आणि त्यांतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. तर आम्ही जिवंत आहोत असा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. तर अमोल मिटकरी यांना धमकी देणाऱ्या लोकांना मी सांगतो की, वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा जिथ यायचं आहे, तिथे बोला आणि तुम्हाला आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, उगाच माध्यमांसमोर बूम आला तर काही बडबडू नये, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.