एकनाथ खडसेंवरील कारवाई राजकीय आकसापोटी, जयंत पाटील यांचा आरोप

| Updated on: Jul 08, 2021 | 4:03 PM

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली आहे. आता खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jul 08, 2021 04:03 PM
Video : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात… व्हिडीओ व्हायरल
Devendra Fadnavis Video | सर्व मंत्र्यांना चांगली खाती मिळाली, महाराष्ट्राला याचा चांगला फायदा होणार : देवेंद्र फडणवीस