Sambhajinagar मंत्रिमंडळ बैठकीतून विरोधकांना काय अपेक्षा? ‘… अशी आशा करतो’; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 16, 2023 | 1:20 PM

VIDEO | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज अख्ख राज्य मंत्रिमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक, याच बैठकीवर जयंत पाटील म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर, १६ ऑक्टोबर २०२३ | आज संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ दाखल झाले आहेत. 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत असून याच बैठकीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या राज्य सरकारच्या बैठकीवर जयंत पाटील यांनी ट्वीट करत मोठं वक्तव्य केले आहे. ‘दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.’, अशी मागणी जयंत पाटील यांनी मराठवाड्यामध्ये होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून केली आहे.

Published on: Sep 16, 2023 01:20 PM
Sanjay Raut थेटच म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला मी जाणार पण…’
Ganesh Chaturthi 2023 | यंदा पैठणीचे वस्त्र परिधान केलेले आकर्षक बाप्पा नाशिकमध्ये दाखल