Loksabhecha Mahasangram : मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही तर… सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीकडून आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन.... यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले
मुंबई, १ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीकडून आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले. तटकरे म्हणाले, मी अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नाही. मी अधिकृत राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहे. गेल्या दोन वर्षात अनेक उलथापालथी झाली. सत्तेच्या राजकारणामुळे भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुतीचे सरकार पाहत आहोत, टीव्ही 9 ने नेहमीच संवेदनशीलता दाखवली आहे. स्थानिक पातळीवरची एखादी गोष्ट महत्त्वाची नसते पण टीव्ही 9 ने अशा गोष्टींचं महत्त्व ओळखून ते दाखवलं आणि त्यामुळे सरकारी यंत्रणाही खडबडून जागा झाल्याचे त्यांनी म्हटलं. तर सर्व देशाचं लक्ष २०२४ कडे लागलं आहे. दक्षिण भारतापासूनत पूर्व भारतापर्यंत लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमच्याही लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली नाही. पण आम्हाला मत मांडायला संधी मिळाली हे आमचं यश अधोरेखित झालं, असे म्हणत त्यांनी टीव्ही 9 चे कौतुक करत पुन्हा आभार मानले.