अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांचं काम चांगल पण…
कोणी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती
अजित पवार अमोल कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी आहे. अमोल कोल्हे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांचं चांगलं नाव आहे. त्यांनी चांगलं कामही केलं आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. भाजप वैयक्तिकरित्या टीका करत आहे. पण मी राजकारणात समाजसेवा करण्यासाठी आले आहे. आमच्याकडे काही नसतानाही वैयक्तिकरित्या टीका केली जाते. वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, असेही म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अधिक बोलणं टाळलं आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. यावर कोल्हेंनी ट्वीट करत कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की… असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.