माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठंय ते… सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Mar 03, 2024 | 1:57 PM

बारामतीमधील पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. आपला कारभार पारदर्शक आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे पुढे असेही म्हणाल्या हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है.. आमचे विरोधकही म्हणतात..

पुणे, ३ मार्च २०२४ : अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून टीका होत असते. त्यावर सुप्रिय सुळे यांनी पुण्यातील भोर मधील महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बोलताना अप्रत्यक्षपणे उत्तर देत थेट सुनावलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं. माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठंय ते.. सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करत आहे?.. कारण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातील नेत्यांना टोला हाणला आहे. बारामतीमधील पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. आपला कारभार पारदर्शक आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे पुढे असेही म्हणाल्या हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है.. आमचे विरोधकही म्हणतात.. आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत.. हे दुर्दैव आहे की इतकं दूषित राजकारण आज झालंय, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सडकून हल्लाबोल केला.

Published on: Mar 03, 2024 01:57 PM
खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं…
यंदा भाकरी फिरणार… सुनेत्रा वहिनीच…, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार