‘राज्यातल्या गद्दार सरकारची 20 तारखेला अॅनिव्हर्सरी’, राष्ट्रवादीच्या खासदाराची मिश्किल टीका

| Updated on: Jun 13, 2023 | 7:25 AM

VIDEO | ...तर येत्या 20 तारखेला संभाळून राहा, राष्ट्रवादीच्या नेत्यानं का दिला सावधानतेचा इशारा?

पुणे : राज्यातील गद्दार सरकारची अॅनिव्हर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला तिकीट दिले गुवाहाटीला जाण्याचे, तर सांभाळून राहा, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील लोकांना सल्ला देत सरकारला टोला लगावला आहे. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. रेडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून राहा, विचार करा.  गद्दारांना खाजगी हॉटेल लागले, प्रायव्हेट खाजगी विमान सुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघात जावे लोकांना विचारावे. गावभेटी घ्याव्यात लोकांना सांगावे हा मी निर्णय घेतोय तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा का असे एखाद्याने सांगितले नाही. तुम्ही पक्ष बदलत आहे. विचारधारा बदलता, सरकार पाडता एकदा तुम्हाला वाटलं नाही लोकांना विश्वासात घ्यावे असे का वाटले नाही? तिकडे गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या मारता, शॉर्ट कपडे घालता तुम्ही सुट्टीला गेला होता की देशाच्या सेवेसाठी केला होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय

Published on: Jun 13, 2023 07:19 AM
घाई करा, आता फक्त तीन दिवसांची मुदतवाढ; मुंबई विद्यापीठात 15 जूनपर्यंतच नाव नोंदणी करता येणार
‘अजित पवार हे राज्यातलं सक्षम नेतृत्व’, ‘या’ भाजप नेत्यानं व्यक्त केला विश्वास