Special Report | शाळेच्या दाखल्यावर ‘समीर दाऊद वानखेडे’ ?
राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे.
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत की हिंदू यावर आज कोर्टात फैसला होणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल केला आहे. या दाखल्यानुसार समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचंच दिसून येत आहे. राष्ट्रवादीने हा दाखला व्हायर केला असला तरी काही वेळातच वानखेडे हे मुस्लिम की हिंदू आहेत हे कोर्टाकडून स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे. तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला 27 जून 1986चा आहे. त्यातही वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचं दिसून येत आहे.