निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्याचं टीकास्त्र
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांची प्रतिक्रिया
सांगली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली असून तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोग कारवाई करतेय किंवा निवडणूक आयोग म्हणून ते निर्णय घेतायात ते पाहून निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून निर्माण होतोय असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून रद्द झालेल्या दर्जावर भाष्य केले आहे.