वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, मेहबूब शेख यांचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप

| Updated on: Sep 06, 2021 | 12:36 PM

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर कडाडून टीका केलीये. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

लंकेवरील टीकेचा मेहबूब शेख यांच्याकडून समाचार
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

अनिल देशमुखांनी कायद्याच्या दृष्टीनं चौकशीला सामोरं जावं: देवेंद्र फडणवीस
“मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, त्यांचं आंदोलन भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम”