जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला! घाईगडबडीत संधी साधली…

| Updated on: Jul 03, 2022 | 11:45 AM

बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे. आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालंय. अध्यक्ष निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. बघा काय म्हणाले,

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं (Maharashtra assembly speaker) पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे. आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालंय. अध्यक्ष निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. बघा काय म्हणाले,…

कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त नव्हता – आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर!