भिवंडी इमारत दुर्घटनास्थळी NDRF चं बचावकार्य सुरू, १० जणं अद्याप ढिगाऱ्याखाली

| Updated on: Apr 30, 2023 | 8:49 AM

VIDEO | भिवंडी इमारत दुर्घटनास्थळी बचावकार्य वेगानं, तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांचं NDRF च्या पथकाकडून शोधकार्य सुरू

ठाणे : भिवंडीच्या वालपाडा येथे काल एक दुर्दैवी घटना घडली. भिवंडीतील वलपाडा येथे तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळल्याच्या दुर्घटनेतील इमारतीखाली 60 ते 70 लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती काल व्यक्त केली गेली. या घटनेमुळे वालपाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली होती. आजही इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम केले जात आहे आणि त्याखालून दबलेल्या लोकांना काढलं जात आहे. दरम्यान, भिवंडी इमारत दुर्घटनास्थळी NDRF च्या पथकास पाचारण करण्यात आलं आहे. तर NDRF चं बचावकार्य वेगानं सुरूच आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामात अडकलेल्या रहिवाशांचं शोधकार्य अद्याप केले जात असताना १० जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भिती व्यक्त केली जात असल्याने त्या १० जणांचं वेगानं शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Published on: Apr 30, 2023 08:49 AM
बळीराजा संकटात! अकोला, जळगाव जिल्ह्यात कांदा उत्पादक उद्धवस्त! अलकाळीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच- जयंत पाटील