वन्यजीव विभागाचं ठरलं ! नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे 3 पाहुणे येणार

| Updated on: Mar 12, 2024 | 12:25 PM

मे महिन्याच्या अखेरीस व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ सोडण्यात येणार असल्याचे संकेत वन्यजीव विभागाने दिले आहे. हे तीन वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणले जातील. त्यामुळे नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे येण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार

गोंदिया, १२ मार्च २०२४ : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षी 20 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील दोन वाघिणींना सोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा तीन वाघ सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ सोडण्यात येणार असल्याचे संकेत वन्यजीव विभागाने दिले आहे. हे तीन वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणले जातील. त्यामुळे नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे येण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची एक चमू नुकतीच चंद्रपूर येथे जाऊन आले. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या 16 वाघ असून हे तीन वाघ सोडल्यानंतर ही संख्या 19 वर पोहोचणार आहे.

Published on: Mar 12, 2024 12:25 PM
रवींद्र वायकर सत्तेच्या दारी, आरोपांची मालिका करणाऱ्या सोमय्या यांचा अभ्यास निकामी?
गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री, थेट विधानसभा लढवणार?