‘मातोश्री’चा परिसर पुन्हा चर्चेत, भावनिक साद घालणारे बॅनर्स अन् कुणाचे झळकले फोटो?
मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बाहेरील परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसराबाहेर नवे बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर शिवसेनेचा वाघ दिसतोय
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बाहेरील परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसराबाहेर नवे बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर शिवसेनेचा वाघ दिसतोय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशा आशयाची भावनिक साद घालण्यात आली आहे. यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय. यासोबतच उद्धव ठाकरे, रशमी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे फोटोही या बॅनरवर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील कार्यकर्त्यांकडून हे बॅनर्स लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर एकनिष्ठ शिवसैनिक आणि कुटुंबातील आधार असा या बॅनरचा आशय पाहायला मिळत आहे.
Published on: Feb 06, 2024 03:12 PM