सप्तशृंगी गडावर जाताय? भोजन व्यवस्थेसह सुरू झालेल्या ‘या’ नव्या सुविधा माहितीये का?
VIDEO | सप्तशृंगी गडावर फक्त इतक्या रुपयांत मिळणार व्हीआयपी दर्शन, प्रशासनानं सुरू केलल्या या नव्या सुविधा माहितीये का?
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी गडावर आता नव्या सुविधा भाविकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. वणीची देवी म्हणूनही या देवीची ओळख आहे. वृद्ध नागरिकांना दर्शनासाठी शेकडो पायऱ्या चढण्यास त्रास होऊ नये आणि भाविकांचे दर्शन कमी वेळात व्हावे, यासाठी गडावर फनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आली होती. यानंतर सप्तशृंग गडावर आता भाविकांसाठी सशुल्क दर्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांसाठी सशुल्क व्हीआयपी दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकर दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी 100 रुपयांत दर्शनाची सुविधा मिळणार आहे. सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी वाढत असल्याने लवकर दर्शन मिळण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सशुल्क पास घेणाऱ्या व्यक्तींसोबत असणाऱ्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना निःशुल्क पास मिळणार आहे. तसेच 20 रुपयांत प्रसादालयात भोजनाची व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे.