भाग्यश्री आत्राम यांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन’

| Updated on: Sep 13, 2024 | 10:50 AM

वडील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच भाग्यश्री आत्रामांनी थेट इशाराच दिला. माझे वडील शेर तर मीही शेरणी. पण कार्यकर्त्यांना हात लावला तर हात कापून टाकेन, असा इशाराच भाग्यश्री आत्रामांनी दिला. बघा व्हिडीओ

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्रामांनी अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेत आता बाप-लेकीची लढाई पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्रामांनी आपल्या कार्यकर्त्यांना हात लावल्यास हात कापणार, असा थेट इशाराच दिला आहे. भाग्यश्री आत्राम, या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. मात्र भाग्यश्री यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्रामांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. “धर्मराव बाबांच्या भूमिकेनं भाग्यश्री कायम दु:खी होत्या”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना घरात फूट पडू देऊ नका, असं आवाहन केलं होतं .त्यावरुन भाग्यश्रींनी अजित पवारांवर पलटवार करताना, आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते बघा, असा सनसनाटी टोला लगावला. दादा ज्ञान देतात, तुम्ही शरद पवारांना सोडून घर फोडलं, असं भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.

Published on: Sep 13, 2024 10:49 AM