केळीची रोपं उन्हानं करपू नये म्हणून शेतकऱ्याचा जुगाड, नेमकं काय केलं?

| Updated on: May 20, 2023 | 1:06 PM

VIDEO | नंदुरबार जिल्ह्यातील कोरीट येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने केळीच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी केला नवा जुगाड

नंदुरबार : एप्रिल आणि मे महिन्यात केळीची लागवड उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जात असते, मात्र यावर्षी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांमध्ये मरचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मात्र नंदुरबार  जिल्ह्यातील कोरीट येथील जगदीश पाटील या शेतकऱ्याने केळीच्या उन्हापासून बचाव आणि नंतर त्याचाच खत म्हणून उपयोग या दुहेरी गोष्टी लक्षात घेऊन केळी रोपांच्या आजूबाजूला ताग (सन) लागवड करून नवा जुगाड केला आहे. आपल्या शेतात केळी लागवड करण्यापूर्वी दहा दिवसापूर्वी जगदीश पाटील यांनी सन (तागाची) लागवड केली. त्या ठिकाणी सन लागवड केली आहे त्या ठिकाणी रोपांच्या मरचे प्रमाण कमी झाले. यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होत आहे. केळी आणि सण लागवडीला आतापर्यंत एक लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकरी जगदीश पाटील यांनी सांगितले. तर शेतीत नवनवीन प्रयोग करून जमिनीसाठी पोषक असलेल्या आणि उन्हापासून रक्षणासाठीही महत्त्वाचे असलेल्या अशा दुहेरी फायद्याच्या ताग लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्या संशोधनशीलता यातून समोर येत आहे.

Published on: May 20, 2023 01:06 PM
‘मविआतील येतीलच सोबत राष्ट्रवादीचे आमदारही तयार’; भाजपच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
अजित पवार नोटबंदीच्या पाठिशी? अजितदादांनी खास शैलीत केंद्र सरकारला नोटबंदीवरुन घेरलं