Meera Borwankar : व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ बातम्या काय सांगता? अजितदादा अडचणीत?

| Updated on: Oct 16, 2023 | 2:02 PM

VIDEO | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडून नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार चांगलेच चर्चेत आलेत. मात्र आता येरवाड्यातल्या जमिनीबाबत 2011 मधल्या बातम्यांची काही कात्रणं आता व्हायरल होताना दिसताय.

पुणे, १६ ऑक्टोबर २०२३ | येरवाड्यातल्या जमिनीबाबत 2011 मधल्या बातम्यांची काही कात्रणं आता व्हायरल होताना दिसताय. तत्कालीन बातम्यांनुसार मीरा बोरवणकर यांनी केलेल्या अजित पवार यांच्यावरील गंभीर आरोपांना बळ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. येरवाड्यातल्या जमिनीबाबत व्हायरल होणाऱ्या त्या बातम्यांमध्ये जमीन बिल्डरला देण्यास राजकीय दबाव असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात असून सध्या अजित पवार यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून हे गंभीर आरोप करण्यात आले आहे. मॅडम कमिशनर या पुस्तकात तत्कालीन मंत्री दादा असा उल्लेखही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Oct 16, 2023 02:01 PM
Sanjay Raut : मिलावट काय करता? तुमची सडलेली भेळपुरी झालीय; संजय राऊत भडकले
Shambhuraj Desai : राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंप? शिंदे सरकारच्या मंत्र्यानंच केला मोठा गौप्यस्फोट