Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार

| Updated on: Jan 13, 2022 | 5:00 PM

नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका […]

नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे, त्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टत हे प्रकरण पोहोचले आहे, राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता हायकोर्टात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Published on: Jan 13, 2022 03:40 PM
VIDEO : मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय फक्त मनसेचंच, Raj Thackeray यांचं पत्र
Neelam Gorhe | वर्ध्याच्या आर्वी येथील अवैध गर्भपाताची घटना आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी : नीलम गोऱ्हे