NIA Office Security Tightened | प्रदीप शर्मांच्या अटकेनंतर एनआयएच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली

| Updated on: Jun 18, 2021 | 10:52 AM

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या अटकेनंतर एनआयएच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनआयए कार्यालयाला आता सीआरपीएफचं सुरक्षा कवच असणार आहे. कार्यालयात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या अटकेनंतर एनआयएच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनआयए कार्यालयाला आता सीआरपीएफचं सुरक्षा कवच असणार आहे. कार्यालयात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. काल दुपारीच शर्मा आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या एनआयएने अटक केली होती. त्यानंतर आणखी दोघा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याशिवाय एनआयए आता शर्मांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्याही मागावर आहे. आतापर्यंत अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. | NIA Office Security Tightened After The Arrest Of Pradeep Sharma

Sangli Rain | सांगलीत मुसळधार, दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली, कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर
Nalasopara Rain | नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क रस्ता पाण्याखालीच, परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी