मोठी बातमी : देशभरात NIA कडून तब्बल ७६ ठिकाणी छापेमारी, किती कोटींचा ऐवज जप्त?
VIDEO | NIA च्या छापेमारीत २ कोटी ३० लाख जप्त, मुंबईतील 'या' परिसरात झाली छापेमारी
मुंबई : देशभरात NIA कडून तब्बल ७६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील भायखळा परिसरात आज NIA कडून ही छापेमारी करण्यात आली आहे. NIA कडून करण्यात आलेल्या छापेमारी ९ पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स, रायफल आणि २ कोटी ३० लाख रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटचे कनेक्शन NIA च्या तपासातून उघड झाले असून महाराष्ट्रातील संजय बियाणी हत्या प्रकरणाचे NIA कडे महत्त्वाचे धागेदोरे असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नाहीतर कटात काही कबड्डी प्लेअर्स सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Feb 21, 2023 09:01 PM