पुणे दहशतवादी प्रकरण आता NIA कडे, दहशतवाद्यांचे ISIS शी लागेबांधे असल्याचे उघड

| Updated on: Aug 08, 2023 | 3:50 PM

VIDEO | दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न, आता पुढील तपास NIA कडे सुपूर्द

पुणे, ८ ऑगस्ट २०२३ | पुणे दहशतवादी प्रकरणाचा तपास ATS कडून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आता NIA कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुण्यातील दहशतवाद्यांचे ISIS शी लागेबांधे असल्याचे तपासातून समोर आले आहे. करण्यात आलेल्या या तपासातून डॉ. अदनान अली सरकारने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचेही उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ISIS च्या दहशतवादी कारवायांसाठी तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी महाराष्ट्रातील गट सक्रीय होता. या प्रकरणी NIA च्या पथकाने झुल्फीकार बडोदावाला याच्यासह पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार याच्यासह चौघांना अटक केली होती.

Published on: Aug 08, 2023 03:50 PM
My India My Life Goals: लोकं आधी पागल म्हणायचे, पण नंतर 1 लाख झाडे लावल्यामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मान
‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठिशी उभं राहून त्यांना संधी द्यावी’, ‘मनसे’ नेत्याचं मोठं वक्तव्य