Mumbai Restriction | मुंबईतील चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी लागू, सूत्रांची माहिती
ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असले तरीही ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबईतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील चौपाट्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महापालिकेने नवी नियमावली जारी केली आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असले तरीही ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबईतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील चौपाट्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महापालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना महापालिकेचे निर्बंध आणि नियमांनुसारच वागावे लागेल.
मुंबईसाठी काय आहे नियमावली?
– 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.
– नवीन वर्ष असो की थर्टी फर्स्टची पार्टी किंवा लग्न समारंभ या सर्वच ठिकाणी कुठेही आतिषबाजी करता येणार नाही. फटाकेदेखील फोडता येणार नाहीत.
– लग्न समारंभांवरही आता निर्बंध घालण्यात आले आहेत. यापूर्वी समारंभाला 200 जणांची परवानगी देण्यात येत होती. आता मात्र अशा कार्यक्रमांना फक्त 100 जणांची परवानगी दिली जाईल.
– मुंबईतील रेस्टॉरंटदेखील 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.