Shahapur firing : शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्…

| Updated on: Dec 22, 2024 | 5:40 PM

शहापुरातील पंडित नाक्यावरील बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री 9 ते साडे नऊ वाजता दोन अज्ञात मारेकरी मोटरसायकल वरून आले. त्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

शहापूर शहरातील पंडित नाका येथील बाजारपेठेत असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहापुरातील पंडित नाक्यावरील बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री 9 ते साडे नऊ वाजता दोन अज्ञात मारेकरी मोटरसायकल वरून आले. त्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. महालक्ष्मी ज्वेलर्समधील कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण शहापूर शहारातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. पोलिसांनी 48 तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.

Published on: Dec 22, 2024 05:40 PM