Special Report | गुलाबराव पाटील यांच्या कव्वालीवर निलेश राणेंची शिवराळ भाषा !

Special Report | गुलाबराव पाटील यांच्या कव्वालीवर निलेश राणेंची शिवराळ भाषा !

| Updated on: Nov 07, 2021 | 10:00 PM

गुलाबराव पाटील यांनी नशिराबादमधील एका कार्यक्रमात कव्वाली सादर केली होती. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करुन गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता.

मुक्ताईनगर : शिवसेना नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये एका कार्यक्रमात कव्वाली सादर केलं होती. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्या ट्वीटमध्ये निलेश राणेंनी शिवराळ भाषेचा वापर केलाय. त्याविरोधात आता जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. निलेश राणे यांच्याविरोधात मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भाई यांनीही ही तक्रार दाखल केलीय. गुलाबराव पाटील यांनी नशिराबादमधील एका कार्यक्रमात कव्वाली सादर केली होती. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करुन गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता. निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

36 जिल्हे 50 बातम्या | 6.30 PM | 7 November 2021
Special Report | क्रूझ पार्टीत कॉंग्रेसच्या मंत्र्यांना अडकवण्याचा डाव होता ?