Special Report | बॉम्ब फुटले, आरोपांच्या फेऱ्या झाल्या, आता नोटीसवॉर
देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं ते एका कुटुंबाची बदनामी होती, त्यांनी माफी मागावी, त्यांना माझ्या मुलीने (निलोफर खान) कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
मुंबई : गेले अनेक दिवस ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी सुरुच आहे. फडणवीसांनी आरोप करताना मलिकांच्या जायवाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा सनसनाटी आरोप केला. या सगळ्या प्रकाराने मलिक संतप्त आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं ते एका कुटुंबाची बदनामी होती, त्यांनी माफी मागावी, त्यांना माझ्या मुलीने (निलोफर खान) कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे मलिकांच्या लेकीवर आणि जावयावर टीका केल्याने फडणवीस अडचणीत येणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.