नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमने-सामने
बुलढाण्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या समोर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनाच सुनावलंय. अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची थेट तक्रारच भाजपच्या दिल्लीतल्या हायकमांडकडेही केली आहे. मात्र अजित पवारांना कुठं तक्रार करायची करु द्या, म्हणत नितेश राणेंनीही इरादे स्पष्ट केलेत. म्हणजेच आता अजित पवार आणि नितेश राणे आमनेसामने आलेत.
महायुतीत आता अजित पवार विरुद्घ नितेश राणेच आमनेसामने आले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरुन दादांनी भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. मात्र अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करु द्या, असं नितेश राणे म्हणालेत. पुन्हा एकदा नितेश राणेंनी सांगलीतून भडकाऊ वक्तव्य केलंय. बुलढाण्यातून अजित पवारांनी नाव न घेता, नितेश राणे, संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंना फटकारलं. पण, सांगलीतून पुन्हा नितेश राणेंनी भडकावू भाषण केलंच. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चिथावणी नितेश राणेंनी दिली आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप नितेश राणेंच्याच वक्तव्यावर आहे. त्यावरुनच दादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्याच हायकमांडकडे तक्रारही केली. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणेंचं मशिदीत घुसून मारण्याचं प्रक्षोभक वक्तव्य असो की मग शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचं राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा अजित पवार अशा वक्तव्यावरुन संतापल्याचे पाहायला मिळालेच. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट