Video | मुंबईच्या प्रॉपर्टीकार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाहीये, मुंबई आमचीही आहे – नितेश राणे
मुंबईमध्ये दादर येथे भाजपच्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. यानिमित्त भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.
मुंबई : मुंबईमध्ये दादर येथे भाजपच्या कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. यानिमित्त भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाही. मुंबई ही आमचीसुद्धा आहे. त्या दृष्टीकोनातून भाजपच्या विविध कार्यालयाचे उद्घाटन आहे. निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आजचा दौरा आहे. यामध्ये कोणाचा बालेकिल्ला असो किंवा नसो भाजप कसा वाढेल यासाठी ही आमची सुरुवात आहे, असे भाष्य नितेश राणे यांनी केले.