बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, उद्धव ठाकरे आरोपींना वाचवतात; नितेश राणेंचा टोला
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 च्या दंगलीत मुंबईला वाचवले. मात्र आता उद्धव ठाकरे हे 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवत आहेत. त्यामुळे आता भगव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही भाजपाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.