Sindhudurg | नितेश राणे, निलेश राणेंवर गुन्हा दाखल, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने कारवाई

| Updated on: Aug 28, 2021 | 12:26 PM

जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी, शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी, शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रखरणी व कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल झाले आहेत.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

मंत्री बाळासाहेब पाटलांचा तिकीट कापल्याचा किस्सा अजितदादांनी सांगितला!
Baramati | “सांगू का पोलिसांना तुला उचलायला”, अजित पवारांकडून कॅमेरामनला टोला