Nitesh Rane on Uddhav Thackeray : माझ्या वडिलांना संपवण्यासाठी सुपारी दिली गेली, नितेश राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Jul 23, 2022 | 10:27 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे वारंवार ठाकरेंवर टीका करताना दिसतात. तर ठाकरे देखील यावर पलटवार करतात. आता पुन्हा भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच शिवसेना नेते यांच्यात वारंवार वार पलटवार दिसून येतात. दोन्हीकडून टीका करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे वारंवार ठाकरेंवर टीका करताना दिसतात. तर ठाकरे देखील यावर पलटवार करताना दिसतात. आता पुन्हा एकदा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘माझे वडील नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती. तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक सुपारी तथा कथित विवेक सभ्य पक्षप्रमुखांनी दिल्या,’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय. यावरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यताय.

 

 

Published on: Jul 23, 2022 10:27 AM
Swine flu’ in Maharashtra | महाराष्ट्रात ‘Swine flu’चा वेगाने संसर्ग-
Amit Thackeray : ‘गृहमंत्रीपद मिळाल्यास सरकारमध्ये सामील होणार, अमित ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य