त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Sep 21, 2024 | 11:57 AM

धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. काही लोकांनी रस्त्यावर उतरून पालिकेला कारवाईपासून अटकाव केला. त्यानंतर दगडफेक केली आणि रास्तो रोको केला. त्यामुळे धारावीत तणाव पसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या जिहादी मानसिकतेच्या लोकांना देशात, महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर महापालिका जेव्हा अतिक्रमण तोडायला आली तेव्हा तिथल्या जिहादींनी अतिक्रमण तोडायला दिलं नाही. उलट मुंबई महापालिकेची वाहने फोडली. ही अरेरावी आणि दादागिरी आहे, त्यांनी पाकिस्ताना आणि बांगलादेशात जाऊन दाखवावी, असं भाजपचे नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन धारावीतील परिस्थितीवर भाष्य केलं. हा देश संविधानाप्रमाणेच चालणार आहे. या लोकांना जागेवर आणण्याचा आमच्याकडे कार्यक्रम आहे. कायद्याचे सर्वांनी पालन करा. बेकायदेशीर काही होऊ देऊ नका. मुंबईतील परिस्थिती बिघडली तर त्याला जिहादी कारणीभूत असतील, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

Published on: Sep 21, 2024 11:57 AM
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव; नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात…