Nitesh Rane on Raut | ही घ्या शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी, नितेश राणेचं राऊतांना प्रत्युत्तर

| Updated on: Aug 02, 2021 | 11:39 AM

राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेली टीका नितेश राणेंना चांगलीच झोंबली आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असं म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे.

भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती. त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे होता. राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेली टीका नितेश राणेंना चांगलीच झोंबली आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असं म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे.

Published on: Aug 02, 2021 11:39 AM
Saamna Editorial | शिवसेना भवन फोडण्याची भाषा, प्रसाद लाड यांचा ‘सामना’तून समाचार
Sanjay Raut | चुकीला माफी नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लक्षात ठेवेल, राऊतांचा प्रसाद लाड यांचा इशारा