नितेश राणे यांचं आदित्य ठाकरे यांच्यावर व्हिडीओ ट्विट करत टीकास्त्र
काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना!! अशा आशयाचे ट्विट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
नितेश राणे यांनी नेहमीच्या शैलीत खोचक ट्विट करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना!! अशा आशयाचे ट्विट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात आदित्य ठाकरे नारळ फोडायला संघर्ष करताना दिसून येत आहेत. याच व्हिडिओचा आधार घेत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधाल आहे. नितेश राणे हे अनेकदा आदित्य ठाकरेंना टार्गेट करताना दिसून येतात. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यातलं राजकी वैर तर अनेकदा उफाळून आलंय. आणि आताही तेच होताना दिसतंय.