बाजारात पैसे टाकले की संजय राऊत यांच्यासारखी माणसं भेटतात, नितेश राणेंची टीका
भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, संजय राऊत आणि महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली. राजगुरूनगर इथं भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, संजय राऊत आणि महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली. राजगुरूनगर इथं भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. ते नेमके शरद पवार यांचे आहेत की उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही असं सांगताना अतिशय शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली.राज्यात सत्तेत असलेले बैल पाळवल्याशिवाय बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळणार नाही असं ही ते म्हणाले. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना काही बैठका असतात त्यामुळे तिकडं उपस्थित राहवं लागतं, असंही नितेश राणे म्हणाले. शिवसेनेनं खेळ सुरु केला होता, आता आम्हाला आमच्या पद्धतीनं खेळ संपवावा लागेल, असंही नितेश राणे म्हणाले.