Nitesh Rane | शेलाराविषयी लावलेल्या बॅनरबाजीवरून नितेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

| Updated on: Dec 12, 2021 | 6:59 PM

आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय.

मुंबई : राज्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर शेलार यांनीही हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात (High Court) सादर केलाय. त्यानंतर आता आशिष शेलार यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील पुन्हा एकदा रंगण्याची चिन्ह आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला. मग शेलार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर सेना-भाजपमधील वाद शमत असतानाच आता पुन्हा एकदा शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतंय. आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

Devendra Fadnavis | म्हाडा पेपरफुटीची CBI चौकशी झालीच पाहिजे : देवेंद्र फडणवीस
कोरोना काळात सेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता : फडणवीस