आता मुलगाही म्हणतोय घुसून मारू, नारायण राणेंनंतर आता नितेश राणेंची कोणाला धमकी? म्हणाले, चून-चून के मारेंगे
'त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, परवानगी दिल्यानंतर मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर खेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही', राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आता नितेश राणेंची भाषाही तशीच पाहायला मिळतेय
नाशिक येथील सिन्नरच्या प्रवचनात सराला बेटच्या महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्यानंतर आता हिंदूंतर्फे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. अशातच अहमदनगर येथे काल महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते. राणे यांनी या मोर्चातही मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर अहमदनगर पोलिसांनी रविवारी रात्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांच्या प्रवचणातील एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान नितेश राणे यांनी काल नगरमधील मोच्यादरम्यान, “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे,” असे नितेश राणे म्हणाले.