नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल

| Updated on: Nov 10, 2021 | 1:35 PM

नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ या वाक्यासोबत रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो ट्विट केले आहेत.

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. रियाझ भाटीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अशातच नितेश राणे यांनी रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध केले आणि ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ असे सोशन मीडियावर टाकत. आता बाळासाहेबांच्या स्मारकावर मी गोमुत्र शिंपडणार असा हल्लाबोल केला आहे.

 

Published on: Nov 10, 2021 12:29 PM
Aurangabad | कोरोना लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 
Munna Yadav | नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार